पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत रस्ते अपघात सर्वाधिक, पण मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण घटले

महाराष्ट्रातील रस्ते अपघात

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये अपघातांचे प्रमाणही जास्तच आहे. २०१९ च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात ९०९६ रस्ते अपघात झाले. त्यापैकी सर्वाधिक अपघात ७८२ मुंबईत झाले असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. अर्थात याच आकडेवारीवरून एक नवा निष्कर्ष निघाला असून, त्यामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत मुंबईतील रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्याचे प्रमाण २० टक्क्याने कमी झाल्याचे दिसून आले आहे. 

जानेवारी ते मार्च २०१९ या कालावधीत मुंबईत रस्ते अपघातात एकूण ९९ लोक मृत्युमुखी पडले तर ७६९ लोक जखमी झाले आहेत. संपूर्ण राज्याचा विचार केल्यास  मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४३४ इतकी असून, जखमी झालेल्यांची संख्या ३४३४ इतकी आहे. २०१८ च्या आकडेवारीची २०१९ मधील आकडेवारीशी तुलना केल्यास रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण फारसे कमी झालेले नाही. 

पावसाळ्यासाठी पश्चिम रेल्वे सज्ज, २५०० CCTV कॅमेऱ्यांनी सतत लक्ष

गेल्या वर्षी म्हणजेच २०१८ मध्ये महाराष्ट्रात एकूण ३५७१७ रस्ते अपघात झाले. यामध्ये १३२६१ लोक मृत्युमुखी पडले असून, ३१००० लोक जखमी झाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे सर्वाधिक प्रमाण सातारा जिल्ह्यात आहे. या ठिकाणी जानेवारी ते मार्च या कालावधीत ३९ जण मृत्युमुखी पडले आहेत. साताऱ्यात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण ९१ टक्क्याने वाढले आहे. त्या खालोखाल औरंगाबादमध्ये रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची टक्केवारी ८३ टक्के तर लातूरमध्ये ती ६२ टक्के इतकी वाढली आहे.

ज्या ठिकाणी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तिथे प्रतिबंधात्मक उपाय योजले गेले पाहिजेत, असे राज्याचे वाहतूक विभागाचे सहआयुक्त आणि रस्ते सुरक्षा विभागाचे प्रमुख जे. बी. पाटील यांनी सांगितले. या जिल्ह्यांमध्ये रस्ते सुरक्षाविषयक अभियान राबविण्याचे आदेशही संबंधित जिल्हा समित्यांना देण्यात आले आहेत.

रेरा कायद्याच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल

पुणे शहरामध्ये रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची टक्केवारी गेल्यावर्षीच्या तुलनेत ४९ टक्क्याने कमी झाली आहे. ठाण्यातही हे प्रमाण ४२ टक्के इतके आहे. तिथेही रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाण कमी झाले आहे.