पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईतल्या पावसाचा 'दुर्मिळ विक्रम'

पावसाचा दुर्मिळ विक्रम

मुंबई पावसानं नवा विक्रम केला आहे. नोव्हेंबर महिन्यात शहरात आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली असल्याची माहिती भारतीय हवामान खात्यानं दिली आहे. नोव्हेंबर महिन्यात  सर्वाधिक पाऊस होणं हा एक दुर्मिळ विक्रम असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. 

बुलबुल चक्रीवादळामुळे अलर्ट; मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला

१ नोव्हेंबरला पहिल्या सात तासांत एकूण ४६.३ मिलीमीटर पजर्न्यवृष्टी झाली तर ८ नोव्हेंबरला  ६२.३ मिलीमीटर पजर्न्यवृष्टीची नोंद झाली आहे. पहिल्या आठ दिवसांत सरासरी १०८.६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आहे. नोव्हेंबर महिन्यात कोसळलेला हा सर्वाधिक पाऊस असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यासाठी १९०१ पासूनच्या  पावसाच्या नोंदी तपासण्यात आल्या आहेत. 

काँग्रेस शिवसेनेचा पाठिंबा घेईल का, शरद पवारांचा सवाल

यापूर्वी २००९ मध्ये ७७.५ मिलीमीटर, २०१० मध्ये ४७.३ मिलीमीटर आणि १९७९ मध्ये १०१.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. १ नोव्हेंबरपासून महा चक्रीवादळामुळे  मुंबईत अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत.  शुक्रवारी सकाळी मुंबईसह ठाणे, पालघर, डहाणू याठिकाणी वादळीवाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या.