पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा पूर्वपदावर, पावसाची विश्रांती

मुंबई लोकल

मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने बंद पडलेली मध्य रेल्वेची लोकल वाहतूक गुरुवारी पहाटेपासून हळूहळू पूर्ववत होऊ लागली आहे. मध्य रेल्वेवरील जलद आणि धीम्या गतीच्या लोकल धावू लागल्याने बुधवारी रात्री दक्षिण मुंबईच्या परिसरात अडकलेले नागरिक आता घरी परतू लागले आहेत. बुधवारी रात्री मुंबईमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून लोकल वाहतूक सुरू झाली. पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक बुधवारी संध्याकाळीच सुरू करण्यात आली होती.

सभ्यपणाचा राष्ट्रवादीने गैरफायदा घेतला, हर्षवर्धन पाटलांचा आरोप

मंगळवारी रात्रीपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे बुधवारी शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यातच बुधवारी दुपारी रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतूक बंद करण्यात आली होती. बुधवारी संध्याकाळी पश्चिम रेल्वेवरील जलद मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. पण मध्य रेल्वेच्या मार्गावर पाणी साचलेले असल्याने हा मार्ग बंदच ठेवण्यात आला होता. बुधवारी सकाळी नोकरी, व्यवसायासाठी दक्षिण मुंबईत गेलेले अनेक नागरिक त्यामुळे तिकडेच अडकून पडले होते. रस्त्यावरही अनेक ठिकाणी पाणी साचलेले असल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.

गुरुवारी पहाटे मध्य रेल्वे मार्गावरील जलद आणि धीम्या गतीच्या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर हार्बर मार्गावरही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गावरील लोकल वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांनी तूर्त सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तरीही हवामान विभागाने येत्या तीन दिवसांत मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे.

निवडक विरोधकांना लक्ष्य केलं जातंय- राहुल गांधी

बुधवारी दिवसभर मुंबईत पाऊस असल्यामुळे सखल भागात पाणी साचले होते. यामुळे परळ भागातील गणेश मंडळांनाही फटका बसला. या भागातील गणेश मंडळांच्या मांडवामध्ये पाणी शिरले होते. मुंबईसह, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई येथेही बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता. यामुळे या ठिकाणीही पाणी साचले होते.