पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई पाऊस

मुंबई  शहर आणि उपनगराला आठवड्याच्या सुरुवातीला जोरदार पावसानं झोडपलं. सोमवारी  मुंबईत ८.३० ते ११.३० या तीन तासांत मुसळधार पावसाची नोंद झाली. आज देखील मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

पुढील २४ तासांत मुंबईत २०० मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याबरोबरच मुंबई पोलिस आयुक्तांनी देखील ट्विटरद्वारे मुंबईकरांना सावधानता बाळगण्याचे आव्हान केले आहे. याशिवाय कोकण, गोवा, उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पुढचे तीन दिवस कोकण, गोवा मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.