पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी या ८ अपडेट्स नक्की वाचा

मुंबई पाऊस

मुंबईकरांची आठवड्याची सुरुवातही मुसळधार पावसानेच झाली आहे. मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला आहे. रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. परिणामी ऑफिस, शाळा, कॉलेजसाठी  घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना बाहेर काय स्थिती आहे हे जाणून घेऊयात. 

 - मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या सायन आणि माटुंगा स्थानकादरम्यान पाणी साचलं आहे त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशीरानं सुरू आहे.  मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशीरानं सुरू आहे. 

- मरीन लाइन्स स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने चर्चगेट ते मरिन लाईन्स वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र आता पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू आहे. पण पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे या धीम्या गतीनं धावत आहेत.  परिणामी बोरिवली, अंधेरी, वांद्रे, दादर अशा मोक्याच्या ठिकाणी प्रवाशांची गर्दी आहे. 

- हार्बर रेल्वेवरही परिणाम झाला असल्यानं या मार्गावरून ट्रेन या १५ ते २० मिनिटे उशीरानं धावत आहेत. सीबीडी बेलापूर, नवी मुंबईमधील अनेक भागात पाणी साचलं आहे. 

- पश्चिम द्रुतगती मार्ग बोरीवली ते अंधेरी वाहतूकीची कोंडी आहे. सखल भागात पाणी साचल्यानं पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक अत्यंत संथ गतीनं पुढे जात आहे. 

- पूर्व द्रुतगती मार्गावरही मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. 

- एस व्ही रोड, वांद्रे, जुहू, सायन, गांधी मार्केट, दादर पूर्व आणि मध्य  मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे, पाऊसही सुरू असल्यानं वाहतूकीची कोंडी.

- जोगेश्वरी - विक्रोळी लिंकरोडवरही  मोठ्या प्रमाणात वाहतुकीची सकाळपासून कोंडी आहे. 

- नाना चौक परेल, दादर हिंदू कॉलनी, वडाळा, मिलन सबवे, दहीसर सबवे, मालाड सबवे, खार सबवे, मानखुर्द सबवे, पवई ते जेव्हीएलआर या ठिकाणी वाहतुकीची कोंडी.