पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा वेग मंदावला

मुंबई पाऊस

मुंबईसह उपनगरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.  सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे आता रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. पहिल्याच पावसात रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं मध्य रेल्वेची वाहतुकही  अत्यंत संथगतीनं सुरू आहे. मुसळधार पावसामुुळे मध्य रेल्वेच्या कंजुरमार्ग स्थानकावर पाणी साचलं आहे. त्यामुळे धीम्यागती मार्गावरील वाहतुकीस उशीर झाला आहे. सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील रेल्वे या जवळपास १ तास उशीरानं धावत आहेत. तर जलदगती मार्गावरील वाहतूक  अर्धा तास उशीरानं सुरू आहे. 

  ठाणे, ठाकुर्ली, कंजुरमार्ग या मध्य रेल्वेच्या स्थानकावर पाणी भरण्यास सुरूवात झाली आहे. ठाण्यामध्येही सकाळपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. या पावसामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही १० मिनिटे उशीरानं सुरू आहे. हार्बर मार्गावरील वाहतूकही १० ते १५ मिनिटे धीम्या गतीनं सुरू आहे. मुंबईची उपनगरे कांदिवली, बोरिवली, मुलुंड, घाटकोपर, वसई, विरारमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर कायम असल्यानं रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावला आहे.