पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिवाळीनिमित्त मेगाब्लॉक रद्द; मुंबईकरांना दिलासा

मुंबई लोकल

दिवाळीनिमित्त तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रविवारी रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नेहमीच्या वेळापत्रकानुसार तिन्ही मार्गावर आज लोकल धावणार असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. कारण दिवाळीनिमित्त मुंबईकर आपल्या नातेवाईकांना तसंच मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर पडत असतात. मेगाब्लॉक रद्द झाल्यामुळे निश्चितच मुंबईकरांना गर्दीमुक्त प्रवास करत आपल्या नातेवाईकांसोबत दिवाळी साजरी करता येणार आहे. 

 

अयोध्या नगरीत दीपोत्सवाचा विक्रमी 'प्रकाश'

दिवाळीनिमित्त रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक रद्द करत मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. रविवारीच दिवाळी आल्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला. दिवाळीनिमित्त घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना गर्दीचा सामना करवा लागू नये तसंच त्यांचा प्रवास सुखकारक व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र पाडव्यानिमित्त सुट्टी असल्याने सोमवारी रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. 

Diwali : कोकणात फराळ नाही गोडाच्या पोह्यांचा असतो बेत