पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक बुधवारी दुपारी दोन तासांसाठी बंद राहणार आहे. ओव्हरग्रेड गँन्ट्री बसवण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर १२ ते २ या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी दोन तासांसाठी मुंबईवरुन पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. 

 

पुलवामात लष्कराला मोठे यश, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

या ब्लॉक दरम्यान वाहतूक कुसगाव टोलनाका येथून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाद्वारे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. मात्र याठिकाणावरुन फक्त हलकी वाहने आणि प्रवासी वाहनांनाच सोडण्यात येणार आहे. तर अवजड आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना खालापूर आणि कुसगाव टोलनाक्याच्या अलिकडेच थांबवण्यात येणार आहे.

विक्रोळी-जोगेश्वरी लिंकरोडवर डंपरला अपघात; मोठी वाहतूक 

ब्लॉक दरम्यान या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसंच दोन तासांमध्ये हे काम पूर्ण होऊन या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत केली जाईल असे, रस्ते विकास महामंडळ आणि पोलिसांनी सांगितले. 

खासदार पत्नीने लिहिलं, नशीब बलात्कारासारखं आहे...