पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई -पुणे एक्स्प्रेस वे दोन तासांसाठी राहणार बंद

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दुपारी दोन तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड (एमएससीआरटी)ने केले आहे. शेडुंग फाट्याजवळ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सूचना फलक लावण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम ओव्हरग्रेड गँन्ट्री  प्रकारचे असणार आहे. त्यामुळे सूचना फलक लावण्यासाठी एक्स्प्रेस वे वरील वाहतूक बंद करावी लागणार आहे. दुपारी १२ ते २ या या कालावधीत हे काम चालणार आहे. 

जाग वाटपावरून युतीत दुमत, भाजप देत असलेल्या जागा

दोन तासांमध्ये हे काम पूर्ण होऊन या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत केली जाईल असे, रस्ते विकास महामंडळ आणि पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या कालावधीमध्ये प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. या वाहनांना खालापूरपर्यंत प्रवास करता येणार नाही. त्यामुळे त्यांनी कळंबोली सर्कल येथून जुना- मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करावा असे आवाहन  रस्ते विकास महामंडळाने केले आहे. 

पुण्यात पावसाने आतापर्यंत १८ जणांचा घेतला बळी

प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी दोन पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. कळंबोली सर्कल-उरण बायपास रोड- टी पॉइंट- पळस्पे फाटा-कोनगाव-कोन पूल- शेडूंग- चौकफाटा- खालापूर व पुन्हा एक्सप्रेस वे असा पर्यायी मार्ग प्रवाशांना देण्यात आला आहे. तसेच कळंबोली सर्कल - खांदा कॉलनी सिग्नल - पनवेल ओहर ब्रीज - तक्का गाव ( पंचमुखी हनुमान मंदिर ) - पळस्पे फाटा - कोन गाव - कोन ब्रीज - शेंडुंग - चौकफाटा - खालापूर व परत एक्सप्रेस वे असा दुसरा पर्यायी मार्ग प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.  

काळवीट शिकार प्रकरणावर आज सुनावणी