पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना : मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी बंद

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोलिसांनी मुंबई -पुणे एक्स्प्रेस वे वाहतूकीसाठी बंद केला आहे. कळंबोली, कामोठे येथून सुरू होणाऱ्या एक्स्प्रेस वेवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बॅरिकेड्स लावून पोलिसांनी एक्स्प्रेस वे बंद केला. कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे त्यामुळे नागरिकांनी मुंबईतून पुण्यात जाऊ नये यासाठी एक्स्प्रेस वे बंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, जुना महामार्ग देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेसाठी काम करत असाल तरच पोलिसांकडून वाहतुकीची परवानगी दिली जात आहे.

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, केंद्राचे राज्यांना निर्देश

कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांमध्ये भितीचे सावट आहे. अशामध्ये घाबरलेले नागरिक मोठ्या संख्येने आपल्या गावाकडे निघाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने देखील रेल्वे, एसटी सेवा बंद केली आहे. त्यामुळे हे नागरिक मिळेल त्या वाहनाने आपल्या गावाकडे निघाले आहेत. सरकारकडून प्रवास टाळा, गर्दी टाळा अशा सूचना वारंवार करण्यात येत आहे. मात्र नागरिक या नियमांचे पालन करत नसल्याचे दिसू येत आहे. त्यामुळे जनतेची काळजी म्हणून पोलिसांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील दोन्ही दिशेची वाहतूक बंद केली आहे. 

लॉकडाऊन असलेल्या शहरांमध्ये ओला-उबरची सेवा तात्पुरती बंद

कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता शासकीय यंत्रणेकडून हालचालींना वेग आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शाळा आणि ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला. अशामध्ये घाबरलेले मुंबईकर मोठ्या संख्येने गावाकडे निघाले आहे. नागरिकांनी प्रवास करु नये यासाठी कळंबोली येथे पोलिसांनी एक्स्प्रेस वेच्या दोन्ही मार्गिका वाहतूकीसाठी बंद केल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. याठिकाणी प्रवास करु नका, घरी थांबा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.