पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खातेधारकांचा PMC बँकेच्या संचालकाच्या घरावर संतप्त मोर्चा

पीएमसी बँक संचालकाच्या घरावर मोर्चा

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) खातेधारकांनी रविवारी मुंबईत आंदोलन करण्यात आले.  यापूर्वी बँकेतील खातेधारकांच्या एका शिष्टमंडळाने १५ डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. बँकेचे संचालक वरियम सिंग यांच्या घरावर मोर्चा काढला. वरियम सिंग तुंरुगात आहे. त्यांच्या कुटुंबियांनी कोट्यवधीची अलिशान गाडी खरेदी केल्याचे वृत्तानंतर बँकेतील खातेधारकांनी संताप व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने बँकेचे खातेधार रस्त्यावर उतरले. त्यांनी वरियम सिंग चोर आहे, अशा घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले.       

ममतादीदींना प.बंगालमधील नागरिक 'दुश्मन' का वाटतात?

वरियम हा चोर आहे. तो तुरुंगात असला तरी त्याच्यामुळे आमच्या कुटुंबियांना त्रास झालेला आहे. त्यांच्या कुटुंबियांनाही त्रास सहन करावाच लागेल, अशा संतप्त भावना एका महिला खातेधारकाने व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.  'हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि.' (एचडीआयएल) कंपनी  राकेश वधावन आणि सारंग वधावन यांनी बँकेचे कर्ज फेडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी दिले आहेत. खातेधारकांच्या अडचणी लक्षात घेता वधावन याची संपत्ती लवकरात लवकर विकून कर्जाची वसूली करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

पंतप्रधान म्हणाले, मोदीचा पुतळा जाळा पण देशाची संपत्ती नको

एचडीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक सारंग वधावन यांनी बुधावारी आपल्या संपत्तीच्या यादीसह एक शपथ पत्र दिले आहे. यामध्ये त्यांनी कंपनीची मालमत्ता विकण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे म्हटले होते. आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, बँकेवर ४ हजार ३५५ कोटी कर्ज आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीची किंमत ११ हजार कोटी इतकी आहे. त्यामुळे लवकरच बँकेतील घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या खातेधारकांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. हा न्याय लवकरात लवकर मिळावा अशी मागणी खातेधारांकडून करण्यात येत आहे.