पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खारमध्ये इमारतीचा भाग कोसळला, १० वर्षांची मुलगी ढिगाऱ्याखाली

मुंबईः खारमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला (ANI)

मुंबईतील खार रोड परिसरातील १३ क्रमांकाच्या रोडवर एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्याचे सांगण्यात येते. ही घटना मंगळवारी दुपारी १.११ च्या सुमारास घडली. या दुर्घटनेबाबत अधिक माहिती समजू शकलेली नाही. दरम्यान, ही इमारत एका बाजूला झुकल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इमारतीतून रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका ११ वर्षांच्या मुलीला आणि एका सुरक्षारक्षकाला बाहेर काढण्यात यश आले आहे. मुलीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

आपचे ८ उमेदवार जाहीर; पुण्यातून अभिजित मोरे, संदीप सोनावणे लढणार

खार पश्चिम येथील भोले इमारतीचा जिना कोसळला असून ही इमारत एका बाजूला थोडी झुकली आहे. आप्तकालीन विभाग आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. शिडी लावून रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. इमारतीचा भाग कशामुळे कोसळला हे अद्याप समजू शकलेले नाही. बचावकार्य सुरु आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे.

कल्याणमध्ये ७ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

या इमारतीची रचना ही तळघर+५ मजले अशी आहे. ही लेव्हल दोनची दुर्घटना आहे.