पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएमसी बँक घोटाळा: ३२ हजार पानी आरोपपत्र दाखल

पीएमसी बँक

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी ३२ हजार पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपत्रानुसार बँकेतील एका व्यक्तीनेच हा घोटाळा समोर आणला होता. तीन महिन्याच्या तपासानंतर मुंबई पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले आहे.

घाटकोपर: खैरानी रोडवर लाकडाच्या कारखान्याला भीषण आग

पोलिसांकडून दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये एचडीआयएल कंपनीचे संचालक राकेश वाधवा, सारंग वाधवा, माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, बँकेचे माजी अध्यक्ष वरियम सिंग, सुरजीत सिंग अरोरा यांना आरोपी बनवण्यात आले आहे.

'सत्ता आणि खुर्चीने शिवसेनेच्या तोंडाला टाळे लावले' 

आरोपपत्रामध्ये असे म्हटले आहे की, बँकेतील एक कर्मचारी आणि जॉय थॉमस यांच्यामध्ये काही कारणास्तव वाद झाला होता. त्यानंतरच हा घोटाळा समोर आला आहे. थॉमस यांच्यासोबत ज्या कर्मचाऱ्याचा वाद झाला होता त्यानेच आरबीआयसमोर हे प्रकरण आणले. बँक अधिकाऱ्यांना २०१७ पासून ही माहिती होती की, एचडीआयएल कंपनीला दिलेले कर्ज परत आले नाही.  

२५ दिवसांतच दोन मंत्र्यांच्या बंगल्यात बदल

दरम्यान, पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी विविध तपास यंत्रणांनी चौकशी दरम्यान आरोपींची मालमत्ता जप्त केली होती. या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय बँक प्रशासकाकडून घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये विमान आणि घर, आलिशान गाड्यांचा यांचा समावेश आहे. लिलावातून आलेले पैस पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

एनआरसी आणि एनपीआर म्हणजे गरिबांवरील टॅक्स, राहुल

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:mumbai polices economic offences wing is filing charge sheet in esplanade court in pmc bank scam case