पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत लॉकडाऊन दरम्यान पोलिसांवर हल्ला, चौघांना अटक

मुंबई पोलिस

मुंबईमध्ये लॉकडाऊन दरम्यान पोलिसांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहीदे आझम मस्जिदजवळ ही घटना घडली आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करत परिसरात जमलेल्या लोकांना पोलिसांनी हकलवण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि एका पोलिसावर रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पोलिस अधिकारी जखमी झाला आहे. याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. 

म्युच्युअल फंड संकटः RBI कडून ५० हजार कोटींची तरतूद

रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करून जमलेल्या लोकांना त्याठिकाणावरुन निघून जाण्यास पोलिसांनी सांगितले. तर यावेळी घटनास्थळी असलेल्या लोकांनी पोलिसांविरोधात चिथावणीखोर घोषणा देऊन पोलीस पथकावर दगडफेक केली. तर जमावातील एका व्यक्तीने पोलिस अधिकाऱ्यावर रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पोलिसाच्या उडव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. 

मुंबईतल्या या दोन वॉर्डमध्ये १ हजारांहून जास्त कोरोनाग्रस्त

त्याचसोबत जमावाने पोलिसांच्या गाड्यांचे देखील नुकसान केले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या जमावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चार जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर जणांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात कोणीही घराबाहेर पडू नये असे वारंवार आवाहन सरकारकडून आणि पोलिसांकडून करण्यात येत आहे. तरी सुद्धा अनेक जण घराबाहेर पडत आहेत. 

पत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...