पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन बच्चू कडू आक्रमक; पोलिसांनी घेतले ताब्यात

शेतकऱ्यांचे आंदोलन

शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू पुन्हा एखदा आक्रमक झाले आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करवा या मागणीसाठी आमदार बच्चू कडूंनी राजभवनावर मोर्चा काढला आहे. राजभवनाकडे जाणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी अडवले आहे. पोलिसांनी आमदार बच्चू कडू यांच्यासह आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहेत. हा मोर्चा काढण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली होती.

... यापुढे जपून बोला, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारले

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ मिळावी, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी बच्चू कडूंनी मोर्चा काढला आहे. राज्यपालांचे निवासस्थान राजभवन येथे हा मोर्चा धडकणार होता. मात्र पोलिसांनी मोर्चा अडवून बच्चू कडूसह आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. मलबार हिल आणि गिरगाव परिसरातून पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

राफेल विमान खरेदी : फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या

विधानसभा निवडणूक निकाल लागून २२ दिवस झाले तरी राज्यामध्ये सरकार स्थापनेचा पेच सुटला नाही. सरकार स्थापन न झाल्याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसत आहे. राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. अशात सरकार स्थापन न झाल्यामुळे मदत कोणाकडे मागायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 

'भाजपपेक्षा शिवसैनिकांना नरेंद्र मोदींचा जास्त आदर