पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मरिन ड्राइव्ह येथे आंदोलन करणाऱ्या ३० ते ३५ जणांविरोधात गुन्हा दाखल

मरिन ड्राइव्ह येथे आंदोलन

दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ सोमवारी रात्री उशिरा मुंबईतील मरिन ड्राइव्ह परिसरात आंदोलन करण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या ३० ते ३५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परवानगी न घेता आंदोलन केल्यामुळे या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिशा कायद्यासाठी स्वतंत्र समिती गठीत; सतेज पाटलांची माहिती

दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडिया येथे काही जणांनी सोमवारी रात्री उशीरा कँडल मार्च काढला. पोलिसांनी त्यांना अटकाव केला. त्यानंतर पोलिसांनी खबरदारी म्हणून गेट वे ऑफ इंडियाकडे जाणारे सर्व मार्ग बंद केले. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या अटकावामुळे मरिन ड्राइव्ह गाठत कँडलसह ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी सीएए आणि एनआरसीविरोधात घोषणाबाजी केली. कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी या सर्वांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. 

कोरोना विषाणू : महाराष्ट्रात केवळ एक जण रुग्णालयात निरीक्षणाखाली

दरम्यान, सोमवारी मध्यरात्री उशीरा मुंबई पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात सुध्दा घेतले होते. आझाद मैदान ही जागा निदर्शनांसाठी निश्चित करण्यात आलेली असताना सुध्दा आंदोलनकर्त्यांनी मरीन ड्राइव्ह इथे आंदोनल केल्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तर, दिल्लीमध्ये सीएएविरोधात सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान हिंसाचार झाला. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे तर १३० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.  

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर १ एप्रिलपासून टोलवाढ

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:mumbai police registered fir against protesters who had gathered at marine drive to protest against violence in delhi