पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पोलिसांची मोठी कारवाई, मुंबईत १५ कोटींचे २५ लाख मास्क जप्त

२५ लाख मास्क जप्त

मुंबई पोलिसांनी वांद्रे येथे मोठी कारवाई करत सुमारे १५ ते २० कोटी रुपये किंमतीचे २५ लाख मास्क जप्त केले आहेत. सध्या बाजारात मास्कचा तुटवडा भासत आहे. काळाबाजार करण्याच्या हेतूने हा साठा करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई गुन्हे शाखेच्या ९ क्रमांकाच्या यूनीटने ही कारवाई केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. 

मुंबईकरांनो सावधान, पोलिसांच्या नावे फिरणारा तो मेसेज FAKE

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या मास्कला मोठी मागणी वाढली आहे. अनेक ठिकाणी याचा तुटवडा भासत आहे. या अडचणीच्या क्षणी अधिक पैसे मिळवण्यासाठी काही जणांकडून मास्कचा अवैध साठा करुन ठेवला जात आहे. असाच प्रकार वांद्रे येथे झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दोन दिवस लक्ष ठेवल्यानंतर मंगळवारी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई गुन्हे शाखेच्या ९ क्रमांकाच्या यूनीटने ही कारवाई केली. 

पहिल्या कोरोनाबाधित पुणेरी जोडप्याविषयी दिलासादायक बातमी

ज्या गोदामावर छापा टाकला त्याठिकाणी मास्कचा मोठा साठा आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार हे २५ लाख मास्क असून त्याची किंमत सुमारे १५ ते २० कोटी असल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन भेट दिली आहे. पोलिस आता पुढील कारवाई करत आहेत. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून दोघे जण पसार झाल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना दिली. 

कोरोना इफेक्टः 'वर्क फ्रॉम होम'वर सायबर हल्ल्याची भीती