पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून मुंबई पोलिसांनी तब्बल १२५३७ पोस्ट सोशल साईट्सवरून हटविल्या

सोशल मीडिया

आक्षेपार्ह मजकूर किंवा व्हिडिओमुळे मुंबई पोलिसांनी गेल्या २०१९ मध्ये तब्बल १२५३७ सोशल मीडिया पोस्ट काढून टाकल्या आहेत. याचाच अर्थ रोज सरासरी ३५ सोशल मीडिया पोस्ट मुंबई पोलिसांकडून विविध व्यासपीठांवरून हटविण्यात आल्या. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने 'हिंदुस्थान टाइम्स'ला ही माहिती दिली. 

'परीक्षा पे चर्चा' म्हणजे फक्त 'नौटंकी', कपिल सिब्बल यांची टीका

मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या सोशल मीडिया लॅबकडून विविध ग्राहकांच्या सोशल हँडल्सवर लक्ष ठेवले जाते. कोणत्याही हँडलवर काहीही आक्षेपार्ह, प्रक्षोभक असेल तर ते लगेचच काढून टाकण्याचे काम या टीमकडून केले जाते. मुंबई पोलिसांची गुप्तचर यंत्रणा म्हणूनही ही टीम काम पाहते. २०१९ मध्ये या टीमला १२५३७ पोस्ट या प्रक्षोभक, आक्षेपार्ह वाटल्यामुळे त्या सोशल मीडियाच्या विविध व्यासपीठांवरून हटविण्यात आल्या. 

संसदेच्या कँटिनमध्ये लवकरच 'महागाई', नॉनव्हेज पदार्थही कमी करणार

मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबकडून २०१८ मध्ये एकूण ६२०७ आक्षेपार्ह पोस्ट हटविण्यात आल्या होत्या. पण त्यामध्ये २०१९ वर्षात दुप्पट वाढ झाली आहे. या संदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये अनेक घटना घडणार होत्या. यामध्ये लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक, अयोध्ये संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय आणि मुख्यमंत्रीपदावरून महाराष्ट्रात घडलेले राजकारण या सर्वांचा समावेश होता. त्यामुळे आमच्या टीमने खूप मेहनत घेऊन सोशल मीडिया साईट्सवर लक्ष ठेवले.