पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस

मनसे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवत २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अशामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. मुंबई पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवली आहे. कलम १४९ अंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. जर नियमांचे उल्लंघन केले तर कारवाई केली जाईल, असे देखील पोलिसांनी या नोटीसमध्ये सांगितले आहे.

'ईडीच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही'

राज ठाकरे यांची उद्या ईडी चौकशी करणार आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. अशामध्ये मुंबई पोलिसांच्या वतीने मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रतिबंधक नोटीस बजावण्यात येत आहेत. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, मनसे कार्यकर्ते एकत्रित येत कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल अशाप्रकारचे कृत्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशाप्रकारचे कोणतेही कृत्यू करु नये याबाबत मनसे कार्यकर्त्यांना समज देण्यात येत आहे. जर अशाप्रकारचे कृत्य केले तर कायदेशीर कारवाई करण्यता येईल, असे पोलिसांनी नोटीसमध्ये म्हटले आहे.

चिदंबरम यांच्या याचिकेवर SC म्हणाले, तत्काळ सुनावणी 

दरम्यान, राज ठाकरे यांना कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणी ईडीने नोटीस पाठवत २२ ऑगस्टला हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. भाजप सरकार सूडाचे राजकारण करत असल्याची टीका मनसेच्या नेत्यांनी केली आहे. याविरोधामध्ये मनसेने ठाणे बंदची हाक दिली होती तसंच ईडी कार्यालयावर राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांसह धडकणार असल्याचे देखील सांगितले होते. मात्र राज ठाकरे यांनी हस्तक्षेप करत त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आणि ईडी कार्यालयाबाहेर कोणी येऊ नये असे आवाहन केले.

उत्तराखंडः मदतकार्यासाठी जाणारे हेलिकॉप्टर कोसळले