पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA: भाजपच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

देवेंद्र फडणवीस

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भाजप शुक्रवारी मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहे. भाजप या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. फक्त ऑगस्ट क्रांती मैदानावर भाजपला सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता. 

आमच्या व्यथा पक्षासमोर मांडल्या, अहवालानंतर निर्णय होईल-राम शिंदे

कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत मुंबई पोलिसांनी भाजपच्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. भाजपची 'संविधान सन्मान विशाल रॅली' ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगावातील टिळक पुतळ्यापर्यंत निघणार होती. सायंकाळी ४ वाजता भाजपचा हा मोर्चा निघणार होता. मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. 

खातेवाटपावरून काँग्रेस नेत्यांची नाराजी उघड, मुख्यमंत्र्यांना साकडे

माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मंगलदास लोढा यांच्यासह भाजपचे नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. आता मोर्चाला परवानगी नसल्यामुळे या नेत्यांची या ठिकाणी फक्त सभा होणार आहे. याच ठिकाणी ते नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ घोषणा देणार असल्याचे सांगितले जात आहे.  

दिल्ली निवडणूकः राजीव सातव यांच्यावर काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी