पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन अभिनेत्रींची सुटका

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अंधेरीमधील एका तीन तारांकित हॉटेलमध्ये सुरु असलेल्या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटमधून पोलिसांनी दोन अभिनेत्री आणि एका अल्पवयीन अभिनेत्रीची सुटका आहे. 

मुलीच्या लग्नाची चिंता; पुण्यात डीएसके ठेवीदाराची आत्महत्या

तीन अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री ही गायिका देखील आहे. तिनं सावधान इंडिया या क्राइम शोमध्ये काम केलं आहे, तर दुसरी मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करते, तिसरी ही अल्पवयीन असून ती वेबसीरिजमध्ये काम करते अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी संदेश रेवाळे यांनी दिली. पोलिसांनी अंधेरी पूर्व परिसरात असलेल्या हॉटेलवर गुरुवारी  छापे टाकले होते. 

कल्याण : रोजंदारीवर काम करणाऱ्यास १ कोटींचा कर भरण्याची नोटीस

''छाप्यांदरम्यान तीन महिलांची आम्ही सुटका केली. त्यांना बळजबरीनं देहविक्रेयच्या व्यवसायात ढकललं होतं. प्रिया शर्मा नावाची तरुणी ही सेक्स रॅकेट चालवत होती. शर्मा ही टुर  अँड ट्रॅव्हलिंगचा व्यावसाय करते, मात्र तिचा काळ्या  उद्योगात हात होता'', असंही पोलिस म्हणाले. 
पोलिसांनी शर्मा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.