पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत सीप्झजवळ पाईपलाईन फुटली, ... या भागातील पाणी पुरवठा विस्कळीत

मुंबईत मेट्रो ४ चे काम सुरू असताना पाईपलाईन फुटली

मुंबईत मेट्रो ४ चे काम सुरू असलेल्या सीप्झजवळ बुधवारी रात्री पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने मुंबईच्या उपनगरांमध्ये काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तर काही ठिकाणी पुढील दोन दिवस पाणी पुरवठा होणार नाही. ७२ इंचाची या पाईपलाईनमधून अंधेरी पूर्व आणि विलेपार्ले पूर्व या भागांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. मेट्रोचे काम सुरू असताना जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर सीप्झजवळ पाईललाईन फुटली.

कोरोना विषाणू: केरळमध्ये आढळला पहिला रुग्ण

या घटनेमुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने किंवा पाणी पुरवठा न होणारा भाग पुढील प्रमाणे

शिवटेकडी, प्रतापनगर, समर्थनगर, ओबेरॉय टॉवर, पूनमनगर, मॉडर्न कॉलनी, एमएमआरडी कॉलनी, शेर ए पंजाब, मापला डोंगरी, कोकण नगर, इदगाह मैदान, बी टी रोड, नटवर नगर, जोगेश्वरी स्थानक पूर्व, गौतमनगर, त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, मातोश्री क्लब रोड, अम्बेवाडी, श्यामनगर, मेघवाडी, बांद्रेकरवाडी, फ्रॅन्सिस वाडी, सुभाषनगर, होली स्पिरिट हॉस्पिटल, बिंद्रा कॉम्प्लेक्स, सर्वोदयनगर, इंदिरा नगर, संभाजीनगर, गोणीनगर, हरीनगर, शंकरवाडी, महाकाली केव्हज रोड, जनता कॉलनी, मार्केट रोड, हनुमान नगर, गणेश नगर, पम्प हाऊस, विजय राऊत रोड, विलेपार्ले पूर्व, सहारा रोड, फडके रोड