पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग!

मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी

रखरखत्या उन्हाने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाच्या हजेरीने दिलासा मिळाला आहे. मुंबईसह उपनगरात सोमवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.  मुंबई शहरातील, दादर, परळ, विलेपार्ले यासह उपनगरातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, घाटकोपर, अंधेरी, सांताक्रूझ या भागांत जोरदार पाऊस झाला. यापूर्वी अरबी समुद्रात कमी दाबाचा टप्पा तयार झाल्याने मुंबई आणि कोकण परिसरात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.

उद्या मुंबईसह कोकण पट्यात मुसळधार पावसाची शक्यता

पहिल्या पावसात एका बाजूला उन्हाने हैराण झालेले मुंबईकर पावासाचा आनंद घेत होते. तर दुसऱ्या बाजूला लोकल सेवा रखडल्यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या चाकरमान्यांनाचा खोळंबा झाला. स्कायमेट या खासगी संस्थेनेही अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याचे म्हटले असून ११ आणि १२ या दोन दिवसांत मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. सोमवारी रात्रीपासूनच पावसाला  सुरुवात झाल्यामुळे येत्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.