पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर

मुंबई महानगर पालिका

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबई महानगर पालिकेने मोठी घोषणा केली आहे. पालिकेमध्ये काम करणाऱ्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. विधासभा निवडणूकीच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येईल तसंच आचारसंहिता देखील लागू करण्यात येईल. त्यामुळेच पालिकेने सव्वा महिना आधीच कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे.

एमआयएमचे दरवाजे आम्ही बंद केले नाहीत: प्रकाश आंबेडकर

महापालिकेतील नियमित वेतन श्रेणीतील पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त हे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. कोणत्याही मागणीशिवाय तसंच आंदोलनाशिवाय पालिकेने बोनस जाहीर केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, २०१७ मध्ये पालिका कर्मचाऱ्यांना १४ हजार ५०० बोनस देण्यात आला होता. तर २०१८ मध्ये ५०० रुपयांची वाढ करत कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये बोनस दिला होता. मात्र यंदाच्या वर्षी काहीच वाढ करण्यात आली नाही.

चिटफंड प्रकरणी ओडिशा क्रिकेट असोसिएशनच्या माजी सचिवाला अटक