पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात मुंबई सर्वाधिक प्रदूषित शहर, अहवालातून समोर

मुंबई सर्वात प्रदूषित शहर

मुंबईची गणना राज्यातील सर्वात प्रदूषित शहरात करण्यात आली आहे.  ग्रीनपीस इंडिया या पर्यावरण संस्थेच्या वतीने दरवर्षी  अहवाल सादर केला जातो. या अहवालात देशातील प्रदूषीत शहरांची यादी देण्यात आली आहे.  या यादीत मुंबईत देशांतील प्रदूषित शहरांच्या यादीत २०१८ साली ३७ व्या क्रमांकावर होती.  आताही तिचा समावेश प्रदूषित शहरांमध्येच केला गेला आहे.

या अधिकाऱ्यांच्या बदलीची चर्चा तर होणारच!

 गेल्या आठवड्याभरापासून मुंबईत हवेचा दर्जा खालवला आहे. सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील हवेचा दर्जा खालावला आहे. मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुल परिसरात हा दर्जा अत्यंत वाईट असल्याचं नोंदवण्यात आलं आहे.  मुंबईबरोबरच डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी या उपनगरातही  हवेची गुणवत्ता राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकापेक्षा व जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडापेक्षा आठपट अधिक आहे.

CM ठाकरे म्हणाले, 'तान्हाजी' चित्रपट नक्की बघेन, पण...

तर राज्यातील पुणे, पिंपरी, चिंचवड, जालना, लातूर, सांगली, जळगाव, अकोला, सोलापूर या शहरातील हवेची गुणवत्ता जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडापेक्षा  पाच ते आठपट अधिक खालवली आहे. मुंबईच्या हवा प्रदूषणात प्रामुख्यत: पीएम १० घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत असल्याचे ग्रीनपीसच्या अहवालातून समोर आलं आहे.  मुंबईत वाहनांमुळे वाढतं प्रदूषण, बेसुमार लोकसंख्या, उद्योगधंदे व पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या बांधकामामुळे प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली असल्याचं समोर आलं आहे.