पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई मेट्रोच्या कामावेळी दगड पडल्याने एका कामगाराचा मृत्यू, एक जखमी

मुंबई मेट्रो (संग्रहित छायाचित्र)

मुंबईमध्ये मेट्रोचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून, अन्य एक जण जखमी झाला आहे. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मेट्रोसाठी भूमिगत मार्ग तयार करण्याचे काम सुरू असताना दगड पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला तर याच ठिकाणी अन्य एक कामगार जखमी झाला आहे. जखमी कामगाराला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. हा प्रकार कशामुळे घडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात येत आहे.

मुंबईमध्ये सध्या मेट्रो ३ साठी भूमिगत मार्ग तयार करण्याच काम सुरू आहे. पवईजवळ ही घटना घडल्याची माहिती मिळते आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:mumbai metro One labourer dead one injured after a piece of rock mass from the tunnel collapsed