पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीचा मारहाणीत मृत्यू

घटनास्थळी असलेला पोलिस बंदोबस्त

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात काही जणांकडून एका व्यक्तीला मारहाण होत असताना ते सोडावायला गेलेल्या व्यक्तीला झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. एएनआयने हे वृत्त दिले आहे. या प्रकरणी एकूण ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये पाच आरोपींची ओळख पटली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्पना गाडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील एका बांधकामामध्ये अनियमितता असल्याचा व्हिडिओ एक जण चित्रित करीत होता. संबंधित इमारतीचा विकास करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक आणि त्या भागातील नगरसेविका यांच्यात संगनमत असल्याचे तो सांगत होता. या नगरसेविकाच्या पतीने घटनास्थळी येऊन व्हिडिओ चित्रित करणाऱ्याला धक्काबुक्की आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीलाही मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. 

पोलिस पुढील तपास करीत आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mumbai man succumbed to the injuries he sustained when he tried to stop a group of people from beating a man in Bandra Kurla Complex