पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मालाडमधील घटना केवळ अपघात, पालिकेचे अपयश नाही - संजय राऊत

संजय राऊत (ANI)

मुंबईत मालाड पूर्वमध्ये भिंत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे १८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी अद्याप मदतकार्य सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मालाडमधील घटना हे मुंबई महापालिकेचे अपयश नसल्याचे म्हटले आहे. तो केवळ एक अपघात होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत ४४ वर्षांतील दुसरा क्रमांकाचा मोठा पाऊस

एएनआयशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, मालाडमध्ये जे घडले तो केवळ एक अपघात होता. त्याला महापालिकेचे अपयश म्हणता येणार नाही. खूप पाऊस पडल्यामुळे हा अपघात घडला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अनेक बेकायदा बांधकामे आहेत. त्याचा महापालिकेशी संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मालाडमध्ये भिंत कोसळली, मृतांचा आकडा १८ वर

मुंबईत सोमवारी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे शहर आणि उपनगरांत विविध ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना मंगळवारी सकाळी घडल्या. या पावसामुळे मुंबईतील मध्य रेल्वेची लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. रस्ते वाहतूकही मंदावली आहे. खूप आवश्यक असेल, तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना केले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:mumbai malad east wall collapsed incident Its not BMCs failure It is an accident says sanjay raut