पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईः सुटकेसमधील मानवी अवयवांचे रहस्य उलगडले, प्रेमीयुगुल अटकेत

माहीम हत्या प्रकरण

तीन दिवसांपूर्वी मुंबईतील माहीम समुद्रकिनारी एका सुटकेसमध्ये मानवी शरीराचे अवयव सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका प्रेमीयुगुलाला अटक केली आहे. संपत्तीच्या हव्यासातून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. मृत व्यक्तीचे नाव बॅनोटो (वय ६२) असे आहे. बॅनोटो हे अविवाहीत होते. ते मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये संगीताचे कार्यक्रम करत असत. सांताक्रुझ पूर्व वाकोला मस्जिद येथे राहत असत.

हैदराबाद एनकाऊंटरविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

बॅनोटो यांनी काही वर्षांपूर्वी एका तरुणीला दत्तक घेतले होते. या तरुणीचे एका मुलाबरोबर प्रेमप्रकरण सुरु होते. बॅनोटो यांची संपत्ती बळकावण्यासाठी दत्तक घेतलेल्या तरुणीने प्रियकराच्या मदतीने बॅनोटो यांची हत्या केली आणि त्यांच्या शरीराचे तुकडे करुन तीन वेगवेगळ्या सुटकेसमध्ये भरले आणि ते वाकोला येथून वाहत जाणाऱ्या मिठी नदीच्या पात्रात फेकून दिले होते. त्यातील एक सुटकेस माहीम पोलिसांना माहिम दर्ग्याच्या मागे असलेल्या समुद्रात मिळून आली होती. या प्रकरणी माहीम पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. 

'भाजपला उतरती कळा लागल्याचे महाराष्ट्रातील निकालातून स्पष्ट'

पोलिसांना सुटकेसमध्ये मानवी अवयवांसह एक शर्ट-पॅन्ट मिळून आले होते. शर्टच्या कॉलर वर 'अल्मो' टेलर हा मार्क होता. या मार्कवरून गुन्हे शाखा कक्ष ५ ने टेलरचा शोध घेतला. पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून आरोपीचा शोध घेऊन दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

Happy Birthday: मराठी रंगभूमीला वेगळा आयाम देणारा लेखक