पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी कोणाची वर्णी?, आज निर्णयाची शक्यता

मुंबई पोलिस (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे शनिवारी सेवानिवृत्त होत आहेत. मुंबई पोलिस दलाकडून शनिवारी सकाळी त्यांना औपचारिक निरोप दिला जाणार आहे. पण राज्यातील या महत्त्वाच्या पदावर कोणाची वर्णी लागणार हे अद्याप राज्याच्या गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेले नाही. मुंबईच्या नव्या पोलिस आयुक्तांचे नाव लवकरच जाहीर केले जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. हे नाव शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

बालाकोट हवाई हल्ल्यांमुळे अशक्य वाटणारे शक्य झाले - हवाई दल प्रमुख

राज्याच्या गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक परमबिर सिंग यांची या पदावर वर्णी लागू शकते. काही दिवसांपूर्वीच परमबिर सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील तपास पथकाने सिंचन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीनचीट दिली होती. परमबिर सिंग यांच्यासोबतच अतिरिक्त पोलिस महासंचालक सदानंद दाते यांचेही नाव या पदासाठी चर्चेत आहे. सदानंद दाते हे केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर गेले होते. त्यांच्याकडे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे प्रमुख पद देण्यात आले होते. पण ते आता राज्यात परतले आहेत. त्यामुळे त्यांचाही या पदासाठी विचार केला जाऊ शकतो. 

मुंबईच्या पोलिस आयुक्तांचे नाव निश्चित करण्यासाठी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार होती. त्यामध्येच नाव निश्चित करण्यात येईल, असे अनिल देशमुख यांनी शुक्रवारी सकाळी सांगितले होते. मुंबईच्या नव्या पोलिस आयुक्तांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून निश्चित केले जाईल, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले होते.

मुस्लिम आरक्षणामुळे मराठा आरक्षण धोक्यातः फडणवीस

दरम्यान, पुण्याचे पोलिस आयुक्त के व्यंकटेशम, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला, विधी आणि तांत्रिक विभागाचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांचीही नाव या पदासाठी चर्चेत आहे.