पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दोन चक्रीवादळांचा फटका, आठवड्याअखेरीस मुंबई, कोकणात पुन्हा पाऊस

 आठवड्या अखेरीस पावसाचा इशारा

एकाच वेळी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या दोन चक्रीवादळामुळे  हवामानात पुन्हा एकदा बदल होणार आहेत. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात पुन्हा पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

बँकांच्या वेळांमध्ये आजपासून बदल, माहिती घेऊनच बँकेत जा

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अरबी समुद्रात 'क्यार' चक्रीवादळ निर्माण झालं होतं. याचा तडाखा कोकण किनारपट्टीला बसला होता. आता २४ तासांत  'महा' चक्रीवादळ निर्माण झालं आहे. एकाच वेळी अरबी समुद्रात दोन वादळ निर्माण झाल्यानं आठवड्याच्या अखेरीस  मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पुन्हा पाऊस पडणार आहे अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. 

'तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा, दखल न घेतल्यास आंदोलन करू'

मात्र एकाच वेळी दोन चक्रीवादळं निर्माण होण्यामागचं कारण  समोर  आलेलं नाही. तर पुण्यातही  ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. 

 पुणे शहर तसेच आजुबाजूच्या अनेक भागात  वादळीवाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळतील. मात्र २ नोव्हेंबरनंतर पाऊस पूर्णपणे थांबेल अशी माहिती हवामान खात्याचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. 

मंकी हिल ते कर्जत दरम्यान ३० नोव्हेंबरपर्यंत मेगाब्लॉक