पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जगात सर्वाधिक वाहतूक कोंडी मुंबईमध्ये, दिल्ली चौथ्या क्रमांकावर

मुंबईतील वाहतूक कोंडी

जगाचा विचार केल्यास सर्वाधिक वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागतो. सर्वाधिक ट्रॅफिक जाम होणाऱ्या शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक पहिला आला आहे. लोकेशन टेक्नोलॉजी कंपनी टॉमटॉमच्या वाहतूक निर्देशांक (ट्रॅफिक इंडेक्स) मधून ही माहिती पुढे आली. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी सरासरीच्या ६५ टक्के जास्त वेळ लागतो, असे या अहवालातून दिसून आले. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्येसुद्धा वाहतूक कोंडीचा सामना तेथील लोकांना करावा लागतो. तिथे इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी प्रवाशांना सरासरीच्या ५८ टक्के जास्त वेळ लागतो.

मुंबईत आणखी सीसीटीव्ही कॅमेरे, जास्त गुन्हेगारी असलेल्या भागावर लक्ष

टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सनुसार, वाहतूक कोंडीचा सातत्याने सामना करावा लागणाऱ्या शहरांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोलंबियाची राजधानी बोगोटा आहे. तर पेरूची राजधानी लीमा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीचा समावेश यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. तर रशियाची राजधानी मॉस्को पाचव्या क्रमांकावर आहे. 

आठ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ४०० शहरांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. अ‍ॅपल आणि उबरसाठी नकाशा तयार करण्याचे कामही टॉमटॉम कंपनीकडून केले जाते. आधीच्या वर्षाच्या तुलनेत २०१८ मध्ये दिल्ली आणि मुंबईतील रस्ते वाहतूक कमी झाल्याचा उल्लेख यादीमध्ये करण्यात आला आहे. २०१८ मध्ये मुंबईत सर्वाधिक कमी वाहतूक २ मार्च या दिवशी होती. तर सर्वाधिक वाहतूक २१ ऑगस्ट या दिवशी होती. या दिवशी शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले होते.

शालिमार एक्स्प्रेसः जिलेटिन कांड्यांसोबत भाजप सरकारविरोधात पत्र

मुंबईमध्ये रात्री २ ते पहाटे पाच हा गाडी चालविण्यासाठी सर्वात चांगला वेळ असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या वेळेत रस्त्यावर अत्यल्प वाहतूक असते. सकाळी ८ ते १० या वेळेत मुंबईतील रस्त्यांवर सर्वाधिक वाहने असतात. त्यामुळे या काळात गाडी चालवणे जास्त त्रासदायक ठरते, असे अहवालात म्हटले आहे.