पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत कोरोनाचे २०० हॉटस्पॉट, परिसरात कडक निर्बंध

प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यात वाढत चाललेलं कोरोना विषाणूचं संकट थोपवण्यासाठी प्रशासनाचे मोठे प्रयत्न सुरु झाले आहेत. मुंबई आणि उपनगरीय भागात २०० हॉटस्पॉट सील करण्यात आले आहेत, त्याचप्रमाणे विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी परिसरात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. 

कोरोनामुळे राज्यातील ५ कारागृहे 'लॉकडाऊन'

पुढील आदेश येईपर्यंत या २०० हॉटस्पॉटवर निर्बंध हे कायम राहणार आहेत. सील केलेल्या परिसरात कोणालाही बाहेर जाण्याची किंवा आता येण्याची परवानगी नाही. या भागातील सर्वांना अत्यावश्यक वस्तू, औषधं ही पोहोचवण्यात येणार आहेत. 

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आयसीयूतून बाहेर

मुंबईत यापूर्वीच ३८१ परिसर हे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. या कंटेनमेंट झोनमध्ये रेड, ऑरेंज आणि ब्लू असे तीन झोन करण्यात आले आहेत. रेड झोनमध्ये हाय रिस्क असलेल्या, ऑरेंज झोनमध्ये मध्यम रिस्क असलेल्या आणि ब्लू झोनमध्ये कमी रिस्क असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.  कोरोनाचा धोका लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तींची वर्गवारी करण्यात आली आहे. तसेच हाय रिस्क असलेल्यांना क्वारंटाइनही करण्यात आलं आहे.