पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२४ तासांत वाडिया रुग्णालयाला निधी उपलब्ध करुन द्या: हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

स्मारकांची उंची वाढवण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, मात्र रुग्णालयाच्या ट्रस्टला देण्यासाठी नाहीत, अशा शब्दामध्ये गुरुवारी मुंबई हायकोर्टाने सरकारला धारेवर धरले. वाडिया रुग्णालय निधीअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. अशातच, मुंबईतील सर्व रुग्णालय सुरळीत चालावी यासाठी सरकारतर्फे रुग्णालयांना निधी देण्यात यावा अशी मागणी करत दिपेश सिसोदिया यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने सरकारला धारेवर धरले. 

गुंडाला महामंडळावर घेणाऱ्यांनी बोलूच नये, थोरातांचा फडणवीसांना टोला

न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी, स्मारकांची उंची वाढवण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, मात्र रूग्णालयाच्या ट्रस्टला देण्यासाठी नाहीत असे म्हणत हायकोर्टाने सरकारला आणि मुंबई महापालिकेला धारेवर धरलं. २४ तासांत वाडिया रुग्णालयाला निधी उपलब्ध न झाल्यास संबंधित अधिका-यांची परेड घेऊ, असे हायकोर्टाने सुनावले. दरम्यान, संबंधित निधी तातडीने उपलब्ध करुन देऊ असी ग्वाही सरकारी वकिलांनी दिली आहे. 

यापुढे असे विधान खपवून घेणार नाही; बाळासाहेब थोरातांचा इशारा

दरम्यान, वाडिया रुग्णालयाला शासनाकडून ४६ कोटीचा निधी देणात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारचे १६-१७ सालचे थकीत ५० टक्के म्हणजे २४ कोटी दोन दिवसांत दिले जाईल. तर, महापालिकेने २२ कोटी देण्याचे मान्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाडिया रुग्णालय सुरु ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस अंडरवर्ल्डची मदत घ्यायचे का?: फडणवीस