पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई : पावसाने घेतला तिघांचा बळी, २४ तास जोर कायम राहणार

पावसाचा जोर कायम राहणार

पहिल्या पावसाने मुंबईकरांना दिलासा देण्याऐवजी हैराण करुन सोडले आहे. पुढील २४ ते ४८ तास तास शहर आणि उपनगरात पावसाचा जोर कायम राहणार असून काही परिसरात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अदांज मुंबई हवामान विभागाने वर्तवला आहे.   

पहिल्याच पावसात मुंबईची 'तुंबापुरी'

शुक्रवारी शहर व उपनगरात पावसामुळे ९ ठिकाणी शॉर्ट सर्कीटच्या घटना घडल्या. यात तिघांना आपला जीव गमवावा लागला. अंधेरीमध्ये काशीमा युडियार या ६० वर्षांच्या वृद्ध महिला विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. तर गोरेगावमध्ये शॉक लागून चार जण जखमी झाले होते. यातील ६० वर्षीय राजेंद्र यादव  आणि २४ वर्षीय संजय यादव यांनी उपचारादरम्यान प्राण सोडले. 

पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा वेग मंदावला