पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एकतर्फी प्रेमातून मुंबईतील मुलीचा लैंगिक अत्याचार करून खून

बलात्कार (प्रातिनिधिक छायाचित्र)

एक ऑक्टोबरला कांदिवलीतील घराजवळून बेपत्ता झालेल्या एका १४ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला आहे. या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिचा खून करून तिचा मृतदेह जाळण्यात आला. पालघर जिल्ह्यातील तलासरीमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका २५ वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली आहे. 

मराठा आरक्षणः स्थगितीस नकार, जानेवारीत पुन्हा सुनावणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचे या मुलीवर प्रेम होते. त्याने तिच्याकडे याबद्दल विचारणा केली होती. जेव्हा तिने त्याला नकार दिला. त्यावेळी आरोपीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने आपल्याकडील काचेची बाटली संबंधित मुलीच्या डोक्यावर मारली आणि तिचा गळा दाबला. यातच तिचा मृत्यू झाला.

अजय बनवशी असे आरोपीचे नाव आहे. तो कांदिवलीमध्ये राहतो. मृत्युमुखी पडलेली मुलगी त्याच्या शेजारी राहात होती. अजय हा मुंबईत एकटाच राहतो त्याचा बूट धुण्याचा छोटा व्यवसाय आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशमधील आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या सूरमंजिरी लाटकर

एक ऑक्टोबरला दुपारी दोनच्या सुमारास संबंधित मुलगी तिच्या घरातून बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तिचे अपहरण झाले असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिच्या मोबाईलमधील कॉल्सची माहिती घेतल्यावर ती अजय बनवशीच्या संपर्कात होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानंतर पोलिसांनी अजय वापरत असलेल्या दुसऱ्या मोबाईलची माहिती काढल्यावर तो तलासरीला गेल्याचे स्पष्ट झाले. त्यातूनच पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला.