पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तांत्रिक बिघाडाचा पश्चिम रेल्वेला फटका, स्थानकांवर प्रचंड गर्दी

चर्चगेट रेल्वेस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी (HT photo by Kunal Patil) (मुंबई लोकल)

ऐन गर्दीच्या वेळी महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. सुमारे अर्धा तास धीम्या व जलद मार्गावरील सर्व लोक जागच्या जागी उभ्या होत्या. त्वरीत काम करुन ७ वाजून १० मिनिटांनी लोकलसेवा पूर्ववत करण्यात आली. पण यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. 

महालक्ष्मी आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान बाहेरून जाणारी एक केबल पश्चिम रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर पडली. त्यामुळे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संपूर्ण मार्गाचा वीजपुरवठा खंडित झाला. या प्रकारानंतर पश्चिम रेल्वेच्या चारही मार्गांवरील लोकलसेवा ठप्प झाली.