पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अंधेरीत उपचारांसाठी आलेल्या महिलेचे डॉक्टरकडून चित्रीकरण, गुन्हा दाखल

प्रातिनिधिक छायाचित्र

अंधेरीमधील एका केंद्रामध्ये शरीरावरील केस काढण्याच्या उपचारांसाठी गेलेल्या महिलेचे चित्रीकरण केल्याच्या मुद्द्यावरून एका डॉक्टरविरोधात ओशिवारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. २४ जून रोजी ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जून रोजी तक्रारदार महिला संबंधित डॉक्टरांच्या केंद्रामध्ये गेली होती. या उपचारांसाठी तिला अंगावरील सर्व कपडे काढण्यास सांगण्यात आले. डॉक्टरांच्या तीन सहायक महिला त्यावेळी तिथे उपस्थित होत्या. उपचार सुरू असतानाच संबंधित महिलेच्या लक्षात आले की स्मोक डिटेक्टरच्या आत कॅमेरा लावला आहे. तिने लगेचच उपचार थांबविण्यास सांगितले आणि कपडे घातले.

VIDEO: पिस्तुलचा धाक दाखवून दाम्पत्याला लुटले

यानंतर डॉक्टर आणि महिलेमध्ये घटनास्थळी जोरदार भांडणे झाली. यावेळी तिथे कॅमेरा असल्याचे डॉक्टरांनी मान्य केले. पण त्यातील चित्रीकरण १५ दिवसांमध्ये आपोआप नष्ट होते, असे महिलेला सांगितले. पण या सगळ्या प्रकारामुळे चिडलेल्या महिलेने ओशिवारा पोलिस ठाण्यात डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला.

ओशिवारा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश पासलवार म्हणाले की, उपचार केंद्रात उपस्थित असलेल्या डॉक्टरांच्या सहायक महिलांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिलेला तिथे कॅमेरा असल्याचे पहिल्यापासून माहिती होते.