पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनमुळे मुंबईच्या प्रदूषणात ८०% टक्के घट

मुंबई  प्रदूषण

दोन आठवड्यांपूर्वी महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. या लॉकडाऊनचा एक फायदा असा झाला की मुंबईतील प्रदूषणात ८०% टक्के घट झाल्याचं दिसून आलं. एअर क्वालिटी इंडेक्समध्ये गेल्या आठवडाभरात मुंबईतील हवेचा दर्जा समाधानकारक असल्याचं दिसून आलं. मात्र आता संशोधकांनी यावर अधिक संशोधन केलं. 

कोरोनाविरोधात लढण्यासाठी अदानी समूहाकडून १०० कोटींची मदत

दिल्लीतील विज्ञान आणि पर्यावर  केंद्रानं मुंबई आणि नवी मुंबईतील हवेचा दर्जा  दर एक तासानं तपासला.  यावून असं  लक्षात आलं की लॉकडाऊन दरम्यान हवेतील प्रदूषणास कारणीभूत असलेल्या घटकांपैकी नायट्रोजनचं प्रमाण हे ८५% ने घसरले. तर जनता कर्फ्यु दिवशी मुंबईतील नायट्रोजनचे प्रमाण हे ८३% नं कमी होते. गेल्या काही दिवसांत रस्त्यावर खूप कमी वाहाने होती तसेच बांधकाम आणि  इतर उद्योगधंदेही बंद असल्यानं हवेचा दर्जा सुधारत असल्याचं  समोर आलं. 

सीमा सील करा, वाहतूक रोखा, केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश

मुंबईबरोबरच नवी मुंबईतीलही हवेचा दर्जा सुधारताना दिसत आहे. मुंबईच्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी असते, पीक हवर्स म्हणजे कामाच्या वेळी ही कोंडी अधिकच पहायला मिळते. मात्र लॉकडाऊनमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी खूपच कमी झाली आहे आणि याचाच फायदा प्रदूषण कमी होण्यास झाला असं विज्ञान आणि पर्यावर  केंद्राच्या संशोधन विभागाच्या संचालिका अनुमिता रॉय चौधरी म्हणाल्या.