पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनच्या घोषणेनंतर एका दिवसात मुंबई पोलिसांना आले १० हजार कॉल्स

मुंबई पोलिस

नेहमी घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई आज पूर्णपणे थांबली आहे. हे शहर कधीही झोपत नाही असं म्हणतात मात्र कोरोना विषाणूसारख्या भयंकर संकाटामुळे रस्त्यावर शुकशुकाट आहे. गेल्याच आठवड्यात राज्यात लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानंतर मंगळवारी पंतप्रधानांनी संपूर्ण देश लॉकडाऊन असल्याची घोषणा केली. इथल्या लोकांच्या मदतीसाठी मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हेल्पलाइन नंबर जारी केला. ज्यात एका दिवसांत सर्वाधिक तक्रारी आणि शंका-कुशंकांचे फोन मुंबई पोलिसांना आले आहेत. एरव्ही आम्हाला दिवसाला ६ हजार फोनकॉल्स येतात मात्र बुधवारी एका दिवसात आम्हाला १० हजार कॉल्स आले अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. 

देशभरात टोलवसुली बंद; नितीन गडकरींची घोषणा

अनेकांनी औषधं तथा जीवनावश्यक वस्तू खरेदी करु शकत नसल्याच्या तक्रारी कॉल करुन केल्या आहेत. काहींनी तातडीनं वैद्यकीय मदत हवी असताना पोलिस अत्यावश्यक  सेवेची दुकानं बंद करत आहेत अशा तक्रारी फोन करुन केल्या आहेत. तर काहींनी आपल्या भागात जीवनावश्यक वस्तूंची दुकानच बंद असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. कंट्रोल रुमला दिवसाला जवळपास ६ हजार फोन येतात मात्र बुधवारी सर्वाधिक म्हणजे १० हजारांहून अधिक कॉल्स आले अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्यानं हिंदुस्थान टाइम्सला दिली. 

डॉक्टरच कोरोनाग्रस्त, उपचार घेतलेल्यांना क्वॉरंटाईनच्या सूचना

मंगळवारी रात्री पंतप्रधानांनीदेखील संपूर्ण देश लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर रस्त्यावर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. वारंवार सांगूनही लोकांनी गर्दी केल्याचं चित्र पहायला मिळालं, त्यामुळे नाइलाजनं काही दुकानदारांनी आपली दुकानंच बंद केल्याचं चित्र पहायला मिळालं.