पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र! मिलिंद देवरा यांचा पदत्याग

मिलिंद देवरा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले आहे. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तीन सदस्यीय समिती नेमण्याचा प्रस्तावही ठेवला आहे. 

यापूर्वी शनिवारी काँग्रेस नेते केशवचंद यादव यांनी भारतीय युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले होते. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वप्रथम लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांची मनधरणी करुन राजीनामा मागे घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण राहुल गांधींनी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर आता काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमधून राजीनामा सत्र सुरु झाले आहे.