पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत जुलै महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद

मुंबई तापमान

मुंबईत १९ जुलै रोजी आतापर्यंतच्या जुलै महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. वेधशाळेच्या  सांताक्रुझ केंद्रात ३६.२ अंश सेल्शिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नेहमीच्या तापमानापेक्षा ६ अंश सेल्शिअसनं हे तापमान  अधिक होतं. यापूर्वी २२ जुलै १९६० साली जुलै महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. त्यावेळी जुलै महिन्यातील तापमान हे ३४. ८ अंश सेल्शिअस होतं.

खूशखबर! मुंबईतील पाणीकपात रद्द

जुलै महिना हा पावसाचा असतो. यापूर्वी मुंबईत जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती. मात्र आता गेल्या ५० वर्षांतील  विक्रमी तापमानाची नोंद २०१९ च्या जुलै महिन्यात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांच्या जीवाला गारवा देणाऱ्या पावसानंही दडी मारली आहे. शनिवारी मुंबईत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यामुळे तापमानात कदाचित घट होऊ शकते. त्यामुळे शनिवारी शहरातील तापमान हे  ३५ ते २६ अंश सेल्शिअस असण्याची शक्यता  आहे.