पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हाय गर्मी ! मुंबईत तापमान ३८ अंशांवर

मुंबईत तापमान ३८ अंशांवर

विक्रमी थंडीनंतर आता मुंबईकरांना तापमान वाढीचा सामना  करावा लागत आहे. फेब्रुवारी महिन्यात सलग तिसऱ्यांदा मुंबईत तापमानात कमालीची वाढ झालेली पहायला  मिळाली. १७ फेब्रुवारीला मुंबईतील तापमान हे ३८ अंश सेल्शिअसपेक्षाही अधिक होतं. दहा वर्षांत तिसऱ्यांदा तापमान वाढलं आहे. 

कोरोनामुळे TISS मध्ये ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांसोबत भेदभाव

यापूर्वी २०१२ मध्ये मुंबईत फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. त्यावेळी मुंबईत फेब्रुवारी महिन्यात ३९.१ अंश सेल्शियस तापमानाची नोंद झाली होती. मुंबईच्या प्रदूषणातही सोमवारी वाढ झाली. हवेचा गुणवत्ता निर्देशांक ‘वाईट’ होता.

शिवसेनेची भूमिका जाहिरातदार ठरवत नाहीः उद्धव ठाकरे

गेल्या चार दिवसांत राज्यभरातील कमाल तापमानात वाढ होऊन पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला होता. त्यावेळी मुंबईचे तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअसपर्यंत होते. मात्र सोमवारी मुंबईच्या तापमानात अचानक मोठी वाढ झालेली पहायला मिळाली.