पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईः मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, खडवलीजवळ रुळाला तडे

मध्य रेल्वे (संग्रहित छायाचित्र)

खडवली स्थानकाजवळ रुळाला तडा गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. मध्य रेल्वेच्या अप आणि डाउन दोन्ही दिशेच्या गाड्या ३५ ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी लोकल उशिराने धावत असल्यामुळे नोकरदारांचे मोठे हाल झाले आहेत. लांब पल्ल्यांच्या गाड्यांनाही याचा फटका बसला आहे.

शालिमार एक्स्प्रेसः जिलेटिन कांड्यांसोबत भाजप सरकारविरोधात पत्र

खडवली रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेला तडे गेल्याचे आज (गुरुवार) सकाळी ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्वरीत दुरुस्तीचे काम हाती घेतल्याची माहिती आहे. काम पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल याबाबत अद्याप काहीही कळू शकलेले नाही.

... तर डेक्कन क्वीनच्या प्रवासाचा वेळही कमी होणार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:mumbai central railway route affected dute track fracture near khadavali railway station