पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींनी माफी मागावी; राफेलवरून भाजप आक्रमक

भाजप आंदोलन

राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने देशव्यापी आंदोलन सुरु केले आहे. राफेल मुद्द्यावर राहुल गांधी खोटं बोलत असून त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी करत भाजप देशभरामध्ये आंदोलन करत आहे. मुंबईमध्ये देखील भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दादर येथील भाजपच्या कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन सुरु आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन सुरु आहे.

'महाराष्ट्राचे मालक आहोत ही अवस्था १०५ वाल्यांच्या आरोग्यास धोकादायक'

राफेल मुद्द्यावर राहुल गांधीसह काँग्रेसने संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राहुल गांधींना 'जनाची नाही तर मनाची असेल' तर त्यांनी माफी मागावी असे त्यांनी म्हटले आहे. भाजपचे कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले असून राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. 

आता सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या भेटीकडे महाराष्ट्राचे लक्ष

दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये देखील भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन केले आहे. कोलकाता येथे भाजप कार्यकर्त्ये आंदोलन करत असून राहुल गांधीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. तर दिल्लीमध्ये देखील भाजप कार्यकर्ते आम आदमी पार्टीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत.

महात्मा गांधींचा मृत्यू अपघाती; ओडिशामध्ये राजकारण तापले