पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत भिकाऱ्यांची संपत्ती बघून पोलिसही चक्रावले, ८ लाखांच्या FD, घरात लाखो रुपये

नाणी

मुंबईत रेल्वेखाली सापडून मृत्युमुखी पडलेल्या एका भिकाऱ्याची संपत्ती बघून पोलिसांसह अनेक जण चक्रावून गेले आहेत. बिरादीचंद पन्नारामजी आझाद (वय ८२) असे नाव असलेल्या या भिकाऱ्याकडे ८.७७ लाख रुपयांच्या मुदत ठेवी, बँक खात्यात ९६ हजार रुपयांची बचत, तर त्याच्या झोपडीमध्ये १.७५ लाख रुपयांची सुटी नाणी सापडली आहेत. बिरादीचंद आझाद यांच्या कुटुंबियांचा शोध घेताना वाशीतील रेल्वे पोलिसांना ही सर्व मालमत्ता सापडली.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

गेल्या शुक्रवारी बिरादीचंद आझाद यांचा मृतदेह रेल्वे रुळांवर सापडला होता. त्यानंतर रेल्वे पोलिसांकडून त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेतला जातो आहे. त्यांचा मुलगा राजस्थानमध्ये राहतो, अशी माहिती मिळाली आहे. बिरादीचंद आझाद हे हार्बर रेल्वे मार्गावर भिकारी म्हणून लोकांकडून पैसे गोळा करायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही या प्रकरणात चौकशी करीत गेल्यावर बिरादीचंद आझाद यांच्या झोपडीपर्यंत पोहोचलो. त्यांच्यासोबत त्याचे कोणीही नातेवाईक राहात नव्हते, असे त्यांच्या शेजाऱ्यांनी आम्हाला सांगितले. मग आम्ही त्यांच्या झोपडीमध्ये जाऊन तपास केल्यावर ही माहिती समोर आली.

धक्कादायक! भुसावळमध्ये भाजप नगरसेवकांसह कुटुंबातील ५ जणांची हत्या

पोलिस उपनिरीक्षक प्रविण कांबळे यांनी सांगितले की, आम्हाला त्यांच्या झोपडीमध्ये चार मोठे डबे आढळले आहेत. त्या डब्यामध्ये १, २, ५ आणि १० रुपयांची नाणी भरून ठेवली होती. शनिवारी दुपारी आम्ही नाणी मोजायला सुरुवात केली आणि रविवारपर्यंत आम्ही नाणीच मोजत होतो. नाणी मोजल्यावर ते १.७५ लाख रुपये असल्याचे दिसले. झोपडीमध्येच पोलिसांना त्यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड हे सुद्धा सापडले.