रिक्षाच्या किमान भाड्यात वाढ करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी रिक्षाचालकांनी सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात राज्य सरकारशी रिक्षा चालकांच्या संघटनेची बोलणी होणार असून, त्यामध्ये यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. जर तोडगा निघाला नाही तर रिक्षाचालक संपावर जाण्यावर ठाम आहेत.
मुंबईत पुन्हा मुसळधार, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात
रिक्षाच्या किमान भाड्यात वाढ करावी, रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाची निर्मिती करावी, भविष्य निर्वाह निधी आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात त्याचबरोबर ऍप आधारित टॅक्सीसेवा बंद कराव्यात, या कृती समितीच्या मागण्या आहेत. या संदर्भात गेल्या महिन्यात मुंबईत कृती समितीची बैठक झाली होती. त्या बैठकीतच ९ जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. या बैठकीला ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Mumbai Auto-Rickshaw Drivers' Unions have called for a strike starting 12 am tonight over their demand of increase in fare among others.
— ANI (@ANI) July 8, 2019