पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ओला, उबर झाले जुने, नव्या कंपन्यांच्या प्रवेशाने ग्राहकांचा फायदा!

ओला, उबर टॅक्सी कॅब

ओला आणि उबर या दोन्ही अ‍ॅप आधारित टॅक्सीसेवांना मिळणारा प्रतिसाद बघता, या क्षेत्रात आणखी काही कंपन्या उतरणार असल्याची चर्चा गेले काही वर्षे सुरू होती. त्यातच जिओ JEO कॅब, सीईओ CEO कॅब आणि जियो JIYO कॅब यांच्या आगमनाने या क्षेत्रातील स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. लवकरच पालखी कॅब ही सुद्धा नवी सेवा मुंबईत सुरू होणार आहे.

मुंबईमध्ये अ‍ॅप आधारित टॅक्सीसेवा देणाऱ्या नव्या कंपन्या अजून खूप प्रसिद्ध झालेल्या नसल्या तरी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्याकडून विविध सवलती देण्यात येत आहेत. त्यामध्ये स्वस्तात प्रवास, एकसमान दर ही महत्त्वाची सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर ट्रीप रद्द केली तर कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. प्रतिक्षा शुल्कही अत्यंत कमी ठेवण्यात आले आहे. या नव्या टॅक्सी सेवांचे अ‍ॅप गुगल प्लेवर दहा हजारांपेक्षा जास्त जणांनी डाऊनलोड केले आहे. तर मुंबईत या सहा हजार गाड्या उपलब्ध आहेत. या नव्या कंपन्या आणि जुन्या ओला, उबर यांच्यामध्ये अधिकाधिक प्रवासी मिळवण्यासाठी लढाई सुरू झाली तर त्याचा प्रवाशांना फायदाच होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.

ओला, फ्लिपकार्ट कंपन्या क्रेडिट कार्ड लॉन्च करण्याच्या तयारीत

मुंबईत काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे चालक गर्दीच्यावेळी एखाद्या ठिकाणी जाण्यास नकार देतात किंवा जास्तीचे पैसे मागतात. त्यामुळे प्रवाशांनी नव्या अ‍ॅप आधारित टॅक्सींकडे मोर्चा वळवला आणि या कंपन्यांनी मुंबईत चांगला जम बसवला. आता नव्या कंपन्या या क्षेत्रात येत असतील आणि त्या एक समान दरामध्ये प्रवाशांना सेवा देणार असतील, तर त्याचा फायदाच होईल, असे वाहतूक विषयातील तज्ज्ञ ए. व्ही शेणॉय यांनी म्हटले आहे.

फेब्रुवारीमध्ये सुरू करण्यात आलेल्या सीईओ कॅबचे संस्थापक दुर्गेश तिवारी म्हणाले, ओला, उबरप्रमाणे आमच्याकडे कोणतेही छुपे शुल्क नाही. त्याचबरोबर वाढते दरही आम्ही आकारत नाही.

ओला, उबर वाहन चालकांकडून १५ ते २० टक्के कमिशन घेते. पण या नव्या कंपन्या वाहन चालकांकडून अगदी कमी कमिशन घेतात किंवा घेतच नाहीत. सीईओ कॅब वाहन चालकांकडून कोणतेही कमिशन घेत नाही. 

काय सांगता!, पुण्यात वाहन नोंदणीत चक्क घट

जिओ कॅबसाठी काम करणाऱे वाहन चालक समीर शर्मा म्हणाले, या आधी मी एका प्रसिद्ध अ‍ॅप आधारित टॅक्सीसेवेसाठी काम करायचे. पण बारा-बारा तास काम केल्यावर माझ्या हातात अगदीच किरकोळ पैसे यायचे. इथे मला खूप कमी कमिशन द्यावे लागते आणि दिवसभर भरपूर प्रवासी मिळतात.

वातानुकूलित सेवा, कॅबसाठी सहज नोंदणी, आपल्या प्रवासाचे ट्रॅकिंग, घरापर्यंत येऊन तुम्हाला घेऊन जाण्याची सोय यामुळे अनेक ग्राहक काळी-पिवळी टॅक्सीपेक्षा या नव्या व्यवस्थेकडे वळले.