पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

छत्रपती शिवाजी महाराजांचं पोट्रेट साकारून तरुणानं रचला विक्रम

महाराजांचं पोट्रेट साकारून तरुणानं रचला विक्रम

मुंबईत राहणाऱ्या एका तरुणानं प्लास्टिक बिड्स पासून  छत्रपती शिवाजी महाराजांचं मोझॅक पोट्रेट साकारून विक्रम रचला आहे. अंधेरी येथे  नितीन दिनेश कांबळे नावाच्या हायटेक अ‍ॅनिमेटरनं दहा दिवस मेहनत घेऊन महाराजांचं पोट्रेट तयार केलं आहे. 

त्यानं ४६,०८० प्लास्टिकचे बिड्स वापरून १० X८ फुटांचं  हे पोट्रेट साकारलं आहे. यासाठी त्यानं विविध सहा रंगही वापरले आहेत. बाजारात प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी आहे मात्र तिथे पूर्वीपासून उपलब्ध असलेलं प्लास्टिक आहे, या प्लास्टिकबाबत आपण तसं ठोस पाऊल उचललं नाही. मीच याच प्लास्टिकचा वापर करून हे मोझॅक पोट्रेट तयार केलं आहे, असं नितीननं सांगितलं. 

महिला टी-२० विश्वचषक फायनल पाहण्यासाठी आला होता कोरोना बाधित प्रेक्षक

नितीननं हे  तयार करण्यासाठी दहा दिवस मेहनत घेतली आहे. मी रात्रभर यासाठी काम केलं आहे, असंही त्यानं सांगितलं. वर्ल्ड रेकॉर्ड इंडियानं  नितिनच्या कामाची दखल घेतली आहे.

कोरोना विषाणूमुळे कान फिल्म फेस्टिव्हल रद्द होण्याची शक्यता