पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये?

तेजस एक्स्प्रेस

मुंबई ते अहमदाबाद मार्गावर लवकरच देशातील पहिली खासगी व्यवस्थापन असलेली तेजस एक्स्प्रेस धावणार आहे. आयआरसीटीसीकडून या रेल्वेचे व्यवस्थापन केले जाते. दिल्ली ते लखनऊ मार्गावर तेजस एक्स्प्रेस सुरू झाली आहे. आता नोव्हेंबरमध्ये मुंबई आणि अहमदाबाद या दोन महानगरांना या नव्या रेल्वेच्या माध्यमातून जोडले जाईल. 

सौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेससाठी एक्झिक्युटिव्ह कोचचे तिकीट २००० रुपये असणार आहे. तर चेअर कारसाठीचे तिकीट १७०० रुपये असणार आहे. या दोन्ही शहरांमध्ये धावणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसपेक्षा या ट्रेनचे भाडे जास्त आहे. त्याचबरोबर या ट्रेनसाठी डायनॅमिक तिकीट आकारणी केली जाणार आहे. म्हणजेच मागणी वाढल्यास तिकीट दरही वाढणार आहे.

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ही ट्रेन मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावण्यास सुरुवात होईल. तेजस एक्स्प्रेसला १० चेअर कार आणि दोन एक्झिक्युटिव्ह कार असणार आहेत. आठवड्यातून सहा दिवस ही गाडी दोन्ही महानगरांमध्ये धावणार आहे. फक्त गुरुवारी ही गाडी या मार्गावर धावणार नाही. 

आयआरसीटीसीचे पश्चिम विभागाचे महाव्यवस्थापक राहुल हिमालयन म्हणाले, ही गाडी आठवड्यातून सहा दिवस धावेल. त्याचबरोबर या गाडीत सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा असणार आहेत. ही गाडी अहमदाबादहून सकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि मुंबईला दुपारी एक वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. मुंबईहून ही गाडी दुपारी तीन वाजून ४० मिनिटांनी निघेल आणि अहमदाबादला रात्री १० वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. 

मूसानंतर दहशतवादी संघटना सांभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा

तेजस एक्स्प्रेसमध्ये वायफायच्या माध्यमातून प्रवासी गाणी आणि चित्रपटांचा आनंद लुटू शकणार आहेत. गाडीमध्ये २० ट्रेन हॉस्टेस असतील. त्याचबरोबर सुरक्षारक्षक उपलब्ध असतील.